Helmet Hair Problem: हेल्मेटमुळे केस खराब होतात? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

पुढारी वृत्तसेवा

हेल्मेटच्या वापरामुळे केसांचे आरोग्य आणि स्टाईल बिघडते, अशी तक्रार अनेकजण करतात. आता काळजी सोडा, वापरा या भन्नाट ट्रिक्स!

बाईक चालवताना सुरक्षेसाठी हेल्मेट अनिवार्य आहे. पण त्यामुळे केसांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी काही स्मार्ट पद्धती वापरणे गरजेचे आहे.

केस लवकर तेलकट होत असतील, तर घराबाहेर पडण्यापूर्वी केसांच्या मुळांना थोडा 'ड्राय शॅम्पू' लावा. हा स्कॅल्पवरील अतिरिक्त तेल शोषून घेतो.

ड्राय शॅम्पूमुळे हेल्मेट काढल्यानंतरही तुमचे केस चिपचिपे न दिसता एकदम फ्रेश आणि बाऊन्सी दिसतील.

हेल्मेट थेट डोक्यावर घालू नका. त्याआधी केसांवर कॉटनचा स्कार्फ किंवा रुमाल बांधा. यामुळे घामाचा केसांशी थेट संपर्क येत नाही.

हेल्मेट घालताना केस खूप घट्ट बांधू नका. घट्ट पोनीटेलऐवजी 'सैल वेणी' किंवा 'लो बन' निवडा, जेणेकरून केसांवर दाब पडणार नाही.

आपल्या बॅगेत नेहमी छोटा कंगवा आणि ओले टिश्यू ठेवा. हेल्मेट काढल्यानंतर आधी टिश्यूने घाम पुसून घ्या आणि मग केस सेट करा.

खूप घट्ट हेल्मेट निवडू नका. आपल्या डोक्याच्या मापाप्रमाणे योग्य आणि हवेशीर हेल्मेट घेतल्यास केसांना हवा मिळते आणि घाम कमी येतो.

हेल्मेटचे आतील लायनर किंवा पॅडिंग नियमित स्वच्छ करा. यामुळे डोक्याला खाज किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका टळतो.