पुढारी वृत्तसेवा
एका नव्या अभ्यासानुसार, हृदयाचा धोका टाळण्यासाठी पुरुषांना महिलांपेक्षा दुप्पट शारीरिक हालचालीची आवश्यकता असते.
नेचर कार्डिओव्हस्कुलर रिसर्चमध्ये नवीन संशोधन प्रकाशित झाले आहे.
यूके बायोबँकमधील 85,000 हून अधिक सहभागींच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला.
व्यायाम करणाऱ्या महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका 22 टक्के कमी झाला, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण केवळ 17 टक्के होते.
महिलांनी आठवड्यातून सुमारे 250 मिनिटे व्यायाम केल्यास हृदविकाराचा धोका 3० टक्केपर्यंत कमी झाल्याचे आढळले.
पुरुषांना हा लाभ मिळवण्यासाठी दुप्पट, म्हणजेच आठवड्यातून 530 मिनिटांपेक्षा अधिक व्यायाम करणे आवश्यक असल्याचे दिसले.
पुरुषांना दररोज 85 मिनिटे व्यायाम करण्याची आवश्यकता असल्याचेही दिसले.
यामागील संशोधकांनी काही संभाव्य कारणे दिली आहेत. यातील एक म्हणजे महिलांमध्ये जास्त प्रमाणात असलेले इस्ट्रोजेन हार्मोन.
इस्ट्रोजेन हार्मोन हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर सकारात्मक परिणाम करते. हृदयासाठी संरक्षक मानले जाते.
या संशोधनाचा एक महत्त्वाचा संदेश म्हणजे नियमित व्यायामाचे फायदे महिला आणि पुरुष दोघांनाही मिळतात.