पुढारी वृत्तसेवा
हार्ट अटॅक आता कोणत्याही वयात येतो. कोणतेही लक्षणे नसतानाही अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. आता एका नवीन संशोधनानुसार चेहऱ्यावरचे बदल अटॅकची लक्षणे दाखवत असतात
ब्रिटिश हार्ट फाउंडेशने हे संशोधन केले असून चेहऱ्याचे काही बदल तुम्हाला हार्ट अटॅकची लक्षणे दाखवता. ही जर तुम्ही ओळखली तर तुम्ही संभाव्य जीवाचा धोका टाळू शकता.
यामध्ये काही दिवस दाढ जबडा मान दुखणे सुरु होते. जबडा, घसा किंवा हनुवटीमध्ये जडपणा, ताण किंवा वेदना जाणवणे आणि ही वेदना चेहऱ्याच्या वरच्या भागाकडे पसरणे हे हार्ट अटॅकचे मोठे लक्षण असू शकते.
चेहऱ्याचा रंग बदलणे, रक्ताभिसरण मंदावल्याने व ऑक्सिजन पातळी खालावल्याने चेहरा, ओठ किंवा त्वचा असामान्यपणे पिवळी अथवा निळसर पडणे.
कोणतीही शारीरिक मेहनत न करता किंवा उकाडा नसतानाही अचानक चेहरे आणि कपाळावर प्रचंड घाम येणे किंवा त्वचा तेलकट-चिपचिपी दिसणे.
मधुमेही रुग्णांमध्ये अटॅकची लक्षणे खूप सौम्य दाखवतात पण त्याकडे किरकोळ दुखणे म्हणून दुर्लक्ष करणे महागात पडू शकते
डायबिटीज असलेल्या पेशंटमध्ये गाल, तोंड वा चेहऱ्याच्या आसपास अचानक जडपणा किंवा विचित्र अस्वस्थता जाणवू शकतो
जर अशी चेहऱ्यावर कोणतीही असामान्य लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे असते.