पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यात गरमागरम चहा आणि सोबत चमचमीत काहीतरी खाणे म्हणजे स्वर्गसुख! पण नेहमीचे तळलेले भजी किंवा वडे खाऊन तब्येत बिघडण्याची भीती असते. म्हणूनच, काही हेल्दी स्नॅक्स ट्राय करा
भाजलेला मका चहा आणि लिंबू-मसाला लावलेला भाजलेला मका हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. यात भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पचनासाठी उत्तम ठरतात.
मखाना रोस्ट : हलका-फुलका आणि कुरकुरीत मखाना हा चहाबरोबर उत्तम पर्याय आहे. मखान्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते आणि कॅलरीज खूप कमी असतात
उकडलेले किंवा भाजलेले चणे तिखट-मीठ आणि कांदा-टोमॅटो टाकलेली चण्याची चाट चहाची चव दुप्पट करेल. चण्यांमधून शरीराला भरपूर प्रोटीन आणि ऊर्जा मिळते.
मूग डाळ धिरडे : तळलेल्या भज्यांना आरोग्याचा उत्तम पर्याय म्हणजे पुदिना चटणी आणि मूग डाळीचे धिरडे. पचायला हलके आणि प्रोटीनने भरपूर असतात. कमी तेलात किंवा तुपात हे बनवता येतात.
भाजलेली रताळी : पावसाळ्यात गरम रताळ्यावर चाट मसाला आणि लिंबू पिळून खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.रताळे रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवण्यास आणि शरीराला फायबर देण्यास मदत करतात
ओटस किंवा रव्याचे अप्पे : कमी तेलात बनणारे गरमागरम अप्पे पावसाळ्याच्या संध्याकाळसाठी परफेक्ट आहेत. भाज्यांनी भरपूर असलेले अप्पे चविष्ट तर असतातच, शिवाय पोटही भरून ठेवतात.
गूळ-शेंगदाणा चिक्की जर चहा सोबती काही गोड खायची इच्छा असेल, तर गूळ-शेंगदाणा चिक्की किंवा ड्रायफ्रुट्स उत्तम. गूळ आणि शेंगदाण्यामुळे शरीराला लोह (Iron) मिळते आणि पावसाळ्यात शरीरात ऊब निर्माण होते.