पुढारी वृत्तसेवा
हिवाळ्यात व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता अधिक भासू लागते.
शरीर योग्यरीत्या कार्य करण्यासाठी अनेक खनिजांसह पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन आणि प्रथिने आवश्यक असतात.
‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता जाणवत असेल, तर शरीरात वेदना, स्नायू कमकुवत होणे, थकवा आणि आळस येऊ शकतो.
तसेच, त्याचा रोगप्रतिकारक शक्तीवर खोलवर परिणाम होतो.
ज्यामुळे शरीर संसर्गास अधिक संवेदनशील बनते आणि सर्दी, फ्लूसारख्या आजारांना सहज बळी पडते.
तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता दूर करण्यासाठी सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश आवश्यक आहे.
या वेळेत 15 ते 20 मिनिटे सूर्यप्रकाशात राहिल्याने शरीरात व्हिटॅमिन ‘डी’ची पातळी नैसर्गिकरीत्या वाढते.
याव्यतिरिक्त आहारात अंड्यामधील पिवळा भाग, मशरूम, फोर्टिफाईड दूध, दही, तूप आणि फॅटयुक्त मासे यासारखे पदार्थ समाविष्ट करावेत.