पुढारी वृत्तसेवा
तुमचा भांडी घासायचा चोथा किंवा स्क्रब ही दररोज वापरण्याची गोष्ट, पण हाच स्क्रब तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो का, जाणून घेऊ
स्वयंपाकघरातील ओला स्क्रब हा जीवाणूंचा (Bacteria) सर्वात मोठा अड्डा असतो. सततच्या ओलाव्यामुळे त्यात जंतू वेगाने वाढतात.
एका संशोधनानुसार, अनेक दिवस न बदललेल्या किचन स्पंज किंवा स्क्रबमध्ये टॉयलेट सीटपेक्षाही जास्त धोकादायक बॅक्टेरिया आढळतात. कारण ओलावा भांडी घासल्यानंतर स्क्रब खूप वेळ ओलाच राहतो
जुन्या किंवा खूप दिवस वापरलेल्या स्क्रबने भांडी घासल्यास 'E. coli' आणि 'Salmonella' सारखे जंतू भांड्यांद्वारे पोटात जातात. यामुळे फूड पॉयझनिंग, जुलाब आणि पोटदुखी होऊ शकते.
प्लास्टिक किंवा नायलॉनचे स्क्रब जुने झाले की त्यांचे अतिसूक्ष्म कण (Microplastics) भांड्यांना चिकटतात आणि जेवणासोबत पोटात जाऊ शकतात. मायक्रोप्लास्टिकचा धोका होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, घरात रोज जास्त भांडी घासली जात असतील तर दर १ ते २ आठवड्यांनी जुना स्क्रब बदलून नवीन घ्यावा.
जर स्क्रब मऊ पडला असेल, त्याचा रंग बदलला असेल किंवा त्याला आंबट-घाण वास येत असेल, तर तो ताबडतोब कचऱ्यात टाका.
भांडी घासून झाल्यावर स्क्रब स्वच्छ धुवून, पिळून कोरडा ठेवा. तो कधीही साबणाच्या पाण्यात किंवा ओलसर जागी तसाच ठेवू नका.
आरोग्याच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक स्क्रबऐवजी नारळाच्या शेंडीचा चोथा (Coir Scrub) वापरणे सर्वात सुरक्षित आणि उत्तम मानले जाते