Refrigerated Dough | फ्रिजमधील कणकेच्या चपाती खाताय: होऊ शकतो आरोग्यावर परिणाम

अविनाश सुतार

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेपासून तयार केलेल्या पोळ्या पचनसंस्थेवर, ऊर्जेवर आणि आतड्याच्या आरोग्यावर हळूहळू परिणाम करू शकतात

अशा कणकेपासून बनवलेल्या पोळ्यांना किंचित आंबट चव येऊ लागते, जी रासायनिक बदलांची खूण असून पचन जड आणि अस्वस्थ करणारे ठरू शकते

कणीक २४ तासांपेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवल्यास अतीआंबवण सुरू होते, ज्यामुळे ग्लूटेन कमजोर होऊन कणीक चिकट व घट्ट बनते, पोळ्या पचायला कठीण होतात

ताजी कणीक गव्हातील नैसर्गिक जीवनसत्त्वे व खनिजे टिकवून ठेवते. मात्र, दीर्घकाळ साठवण केल्यास ही पोषकतत्त्वे हळूहळू कमी होतात

फ्रीजमधील कणकेच्या पोळ्या पचायला जड होतात. त्यामुळे गॅस, पोटफुगी आणि आम्लपित्त यांसारख्या तक्रारी उद्भवू शकतात

आंबवण सुरू राहिल्याने ग्लूटेनचे अतिविघटन होते. यामुळे कणकेचा पोत बिघडतो, ती लाटायला कठीण जाते आणि शरीरालाही ती पचवणे अवघड जाते

कणकेत स्टार्चचे विघटन जलद गतीने होऊन शरीर त्या लवकर पचवते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते

रक्तातील साखरेवर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तींकरिता हे विशेष महत्त्वाचे असून, वारंवार होणाऱ्या अशा चढउतारांमुळे चयापचय संतुलनावर परिणाम होऊ शकतो

नैसर्गिक यीस्टची क्रिया फ्रिजमध्येही सुरूच राहते, ज्यामुळे वायू आणि सेंद्रिय आम्ले तयार होतात

येथे क्लिक करा