मेणासारखी वितळेल पोटाची चरबी, सकाळी पाण्यातून घ्या 'या' ३ गोष्टी

पुढारी वृत्तसेवा

सकाळच्या ड्रिंक्सचा फायदा

दररोज सकाळी काही नैसर्गिक पेये घेतल्यास शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणाला हातभार लागू शकतो.

मध-लिंबू पाणी

कोमट पाण्यात १ चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे शरीर ताजेतवाने राहण्यास मदत होते.

कसे तयार कराल?

पाणी खूप गरम नसावे. हलके कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्या.

जिऱ्याचे पाणी

जिऱ्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे पाणी पचनक्रियेला मदत करू शकते.

जिऱ्याचे पाणी कसे प्यावे?

रात्री एक ग्लास पाण्यात जिरे भिजवा. सकाळी ते गाळून पाणी कोमट करून प्या.

दालचिनीचे पाणी

दालचिनीतील नैसर्गिक घटक चयापचयाला (Metabolism) मदत करू शकतात.

दालचिनीचे पाणी कसे बनवाल?

दालचिनी रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजवा, हे पाणी सकाळी प्या.

महत्त्वाची सूचना : ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्‍याही समस्येवर तज्ञांचा सल्ला घ्यावा..