पुढारी वृत्तसेवा
कचरा समजून फेकताय का?
अनेकदा आपण भाज्यांची सालं कचरा समजून डस्टबिनमध्ये टाकतो, पण ही तुमची मोठी चूक ठरू शकते.
पौष्टिकतेचा खजिना
भाजीच्या गरापेक्षाही जास्त पोषक तत्त्वं अनेकदा त्यांच्या सालींमध्ये दडलेली असतात, जी आपण वाया घालवतो.
बटाट्याची साल (Potato)
बटाट्याची साल काढू नका; यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी असते, जे हृदयासाठी उत्तम आहे.
काकडीची साल (Cucumber)
काकडीची साल न काढता खाल्ल्याने शरीराला जास्त फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स मिळतात, ज्यामुळे पचन सुधारते.
दुधी भोपळा (Bottle Gourd)
दुधीची साल फेकून देण्याऐवजी त्याची चटणी किंवा थालीपीठ करा; यात वज्र घटवण्यास मदत करणारे फायबर असते.
गाजर (Carrot)
गाजराची सालं काढल्याने त्यातील फायटोन्युट्रिएंट्स कमी होतात. फक्त हलके घासून स्वच्छ धुणे पुरेसे असते.
वांगी (Eggplant)
वांग्याच्या सालीमध्ये 'नासुनिन' नावाचे अँटी-ऑक्सिडंट असते, जे मेंदूच्या पेशींचे संरक्षण करण्यास मदत करते.
आरोग्याची गुरुकिल्ली
पुढच्या वेळी भाजी चिरताना विचार करा! सालं न काढता भाजी बनवणे हे केवळ सोपे नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.