Kesar Milk Benefits: दुधात केसर चिमटभर, फायदे मुठभर! मात्र वापरण्याची योग्य पद्धत कोणती?

Anirudha Sankpal

नैसर्गिक औषधी

केशर हे केवळ मसाल्याचा पदार्थ नसून आयुर्वेदामध्ये त्याला शक्ती देणारे एक महत्त्वाचे औषध मानले गेले आहे.

रोगप्रतिकारशक्ती

केशरामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून आजारांशी लढण्यास मदत करतात.

मानसिक आरोग्य

केशर एक 'नॅचरल मूड बूस्टर' आहे; जे तणाव, चिंता कमी करून मन प्रसन्न ठेवण्यास आणि चांगली झोप लागण्यास मदत करते.

हृदयविकार

हे शरीरातील सूज कमी करते आणि हृदयाच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करून हृदयाला निरोगी ठेवते.

Heart Attack | canva Image

त्वचेचा निखार

केशराचा वापर त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे कुमकुमादी तेलासारख्या औषधांत केला जातो.

पचनशक्ती

गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याच्या समस्येवर केशर गुणकारी असून ते पचनसंस्था शांत ठेवण्याचे काम करते.

वापरण्याची पद्धत

केशर खूप प्रभावशाली असल्याने दररोज दुधात किंवा कोमट पाण्यातून याचे केवळ १-२ धागे घेणे पुरेसे असते.

अष्टपैलू मसाला

चव, सुगंध आणि आरोग्याचा त्रिवेणी संगम असलेले केशर अन्नासोबतच सौंदर्यासाठीही वरदान ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा