Namdev Gharal
आपल्याकडे लहान मुल जेंव्हा आईचे दूध सोडून बाहेरचे खायला घातले जाते त्यावेळी बाळाचा पहिला आहार म्हणून भाताची पेज हाच सर्वात सुरक्षित आणि पहिला पर्याय असायचा.
आजच्या काळात पॅकबंद रेडीमेड सप्लिमेंट्स उपलब्ध असते पण पुर्वी बाळाला भाताची पेज हाच बाहेरचा पहिला आहार होता त्यामुळे पेज हे लहानपनापासूनच खूप आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते
पूर्वीच्या काळी बाळाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणि त्याचे वजन व्यवस्थित वाढण्यासाठी भाताची पेज हा एक हक्काचा आणि पारंपरिक घरगुती आहार होता. त्यामुळे भाताच्या पेजचे खूप फायदे आहेत
भाताच्या पेजेमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे ताप, सर्दी किंवा थकवा आल्यास १ वाटी पेजेमुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते.
ही पेज पचायला अत्यंत हलकी असल्याने जुलाब, उलट्या, अपचन किंवा गॅसचा त्रास होत असल्यास पोटाला त्वरित आराम मिळतो. आणि आतड्यांची सूजही कमी होते.
उन्हाळ्यात किंवा आजारपणात शरीरातील पाणी कमी झाल्यास, पेजेमध्ये थोडे मीठ टाकून पिल्याने डिहायड्रेशनचा धोका टळतो आणि इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात.
सहा महिन्यांपेक्षा मोठ्या लहान मुलांसाठी हा एक उत्तम आणि सुरक्षित पूरक आहार असून, यामुळे बाळाचे वजन वाढण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
पेजेचे पाणी चेहऱ्याला लावल्यास त्वचेची चमक वाढते आणि हे पाणी केसांसाठी नॅचरल कंडिशनर म्हणून काम करते.
पेजेची पौष्टिकता आणखी वाढवण्यासाठी त्यात एक चमचा शुद्ध तूप, थोडे जिरे आणि सैंधव मीठ मिक्स करून गरमागरम पिणे जास्त फायदेशीर ठरते.