Mung dal health benefits: मुगडाळ खाण्याचे 'हे' १० फायदे तुम्हाला माहितच नसतील

पुढारी वृत्तसेवा

मुगडाळीमध्ये प्रथिनांचे प्रमाण तब्बल २७% असते. यात शरीरासाठी आवश्यक असणारे अँमिनो ॲसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

मुगडाळीतील ‘अँटीऑक्सिडंट्स’ शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करतात. यामुळे मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजारांचा धोका टळतो.

मुगडाळीचे सूप प्यायल्याने शरीराला थंडवा मिळतो. यातील अँटीऑक्सिडंट्स कडक उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास व तहान शमवण्यास मदत करतात.

मुगडाळ नियमित खाल्ल्याने रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) चे प्रमाण कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते.

मुगडाळीत फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक असतात, जे उच्च रक्तदाब कमी करण्यास व नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

१ कप शिजवलेल्या मुगडाळीत १५.४ ग्रॅम फायबर असते. इतर डाळींच्या तुलनेत मुगडाळ पचायला खूप हलकी असते आणि यामुळे पोटात गॅस होत नाही.

मुगडाळीत असणारे प्रोटीन, फायबर आणि 'विटेक्सिन'सारखे घटक रक्तामध्ये साखर हळूहळू मिसळू देतात, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

मुगडाळ खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. यामुळे कॅलरी Intake कमी होऊन वजन वेगाने घटते.

मुगडाळीमध्ये फॉलेट आणि आयर्न भरपूर असते, जे गर्भातील बाळाच्या योग्य वाढीसाठी आणि आईला ॲनिमियापासून वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

मुगडाळ तुम्ही खिचडी, सूप, वरण, सॅलड किंवा मोड आणून उकडून खाऊ शकता. ही पचायला हलकी आणि चवदार असते.