पुढारी वृत्तसेवा
कुळीथ हे साधारणपणे तांबूस, काळे आणि पांढरे अशा तीन रंगांत आढळते.
याला 'हुलगे' म्हणूनही ओळखले जाते.
यापैकी काळ्या रंगाचे कुळीथ हे आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जातात.
कुळीथ उकळून त्याच्या पाण्याचे 'सार' (सूप) बनवले जाते, त्याला 'काट' म्हणतात. हे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असते.
जर तुम्हाला वातविकार किंवा खोकल्याचा त्रास असेल, तर कुळीथाचा गरम काढा करून प्यावा.
वाढलेले वजन किंवा चरबी कमी करायची असेल, तर नियमितपणे ५ ते ७ दिवस कुळीथाचा काढा घ्यावा. यामुळे मेद कमी होण्यास मदत होते.
मुतखड्याचा त्रास असल्यास कुळीथाच्या काढ्यामध्ये उन्हाळीचे (शरपंखीचे) चूर्ण आणि २ ग्रॅम सैंधव मीठ टाकून घ्यावे. यामुळे खडा विरघळण्यास मदत होते.
मूत्रमार्गात काकरी किंवा बारीक रेतीचे कण साठल्यास कुळीथाचा चहा प्यावा. यामुळे लघवीवाटे बारीक खडीचा चांगला निचरा होतो.
अतिसार (जुलाब) होत असल्यास, कुळीथाच्या ओल्या झाडाचा १० ग्रॅम रस आणि २ ग्रॅम कात पावडर एकत्र करून दिवसातून तीन वेळा घ्यावी.
ताप आल्यावर शरीराला सुटणारा अतिप्रमाणतील घाम बंद करण्यासाठी, भाजलेल्या हुलग्याचे (कुळीथाचे) पीठ करून ते अंगाला चोळावे.
कुळीथ हे निसर्गाने पित्तकारक आणि तीक्ष्ण (उष्ण) असते. त्यामुळे गरोदर महिला, रक्तपित्त आणि क्षयरोग असलेल्या रुग्णांनी याचे सेवन करू नये.