Jowar bhakri : वजन कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी खावी का?

पुढारी वृत्तसेवा

ज्वारीची भाकरी महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांचे मुख्य अन्न आहे

पारंपरिक आणि आरोग्यदायी अन्न म्हणून ज्वारीच्या भाकरीकडे पाहिले जाते

वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी ज्वारीची भाकरी जरूर खावी

रक्तातली साखर नियंत्रणात राहण्यासाठी ज्वारीच्या भाकरीचा आहारात जरूर समावेश करावा

ज्वारीच्या भाकरीमध्ये अनेक पोषकतत्वे आणि जीवन सत्त्वे असतात

कॉलेस्टेरोल नियंत्रणासाठी ज्वारीची भाकरी उत्तम पर्याय आहे

ज्वारीमध्ये फायबर जास्त असल्याने, ती खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते

ज्वारीत फिनोलिक संयुगे आणि चरबी विरघळणारे संयुगे असतात. यामुळे जळजळ व उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो