Moong Dal: मूग खाण्याचे १० जबरदस्त फायदे: काळे की हिरवे, कोणते मूग जास्त पौष्टिक?

पुढारी वृत्तसेवा

मुगाच्या हिरवे व काळे अशा दोन जाती आहेत. हिरव्या सालीचे मूग जास्त गुणकारी तसेच पौष्टिक आहेत.

मुगाच्या उकडून काढलेल्या पाण्याने पोटाला वात (गॅस) धरत नाही, इतकेच नव्हे तर दुधाऐवजी मुगाचे पाणी जास्त उपयुक्त आहे.

पित्तज्वरात : १०० ग्रॅम मूग डाळीचा ४ पेले पाणी घालून पाव भाग काढा तयार करून गाळून त्यात ५ ग्रॅम मध घालून घ्यावा.

आजारी माणसास पथ्यकर : आख्खे मूग शिजवून रवीने घोटून पाणी गाळून घ्यावे व ते पाणी आजारी माणसास पिण्यास द्यावे. आवश्यक तर चवीसाठी तूप, जिरे याची फोडणी द्यावी.

ताप, मधुमेह, ब्लडप्रेशर (उच्च रक्तदाब), कॅन्सर, अर्धांगवात : नुसते मूग भाजून त्याचे पाणी घेणे हितावह असते.

पाचक म्हणून : मुगाच्या डाळीचे वरण, तसेच मोड आलेल्या मुगाची उसळ किंवा आमटी करून जेवणात घ्यावी.

मूतखडा : ५० ग्रॅम मुगाचा अर्धा लिटर पाण्यात अर्धा भाग काढा तयार करून, २१ दिवस घ्यावा. खूप आराम पडतो.

दाहज्वर, उलटी : भाजलेल्या हिरव्या मुगाचा पाव भाग काढा करून, गाळून त्यांत साळीचे कुरमुरे, साखरं व मध घालून घ्यावा.

वीयवर्धक : भाजलेल्या मुगाचे पीठ गाईच्या तुपात खरपूस भाजावे. त्यात गाईचे दूध, साखर, बदाम, पिस्ते, वेलची लवंग घालून लाडू तयार करावेत व रोज एक लाडू सकाळी खावा. हे लाडू पित्तशामक देखील आहेत.