कच्ची केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे; पचनापासून वजन नियंत्रणापर्यंत फायदेशीर!

पुढारी वृत्तसेवा

पचनसंस्था राहते निरोगी!

कच्च्या केळ्यांमधील फायबर आणि रेझिस्टंट स्टार्च आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

बद्धकोष्ठतेपासून मिळतो आराम!

फायबरमुळे पोट साफ राहण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

रक्तातील साखर राहते नियंत्रणात!

कच्च्या केळ्यांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असून रेझिस्टंट स्टार्चमुळे रक्तातील साखर हळूहळू वाढण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर!

कच्ची केळी खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही.

हृदयाचे आरोग्य सुधारते!

कच्च्या केळ्यांमधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

शरीराला मिळतात आवश्यक पोषक घटक!

व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६ आणि मॅग्नेशियममुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते.

आतड्यांतील चांगल्या जीवाणूंना मदत!

रेझिस्टंट स्टार्च प्रीबायोटिकप्रमाणे कार्य करून आतड्यांतील उपयुक्त जीवाणूंच्या वाढीस मदत करतो.

दीर्घकाळ राहते पोट भरलेले!

फायबर आणि रेझिस्टंट स्टार्चमुळे पोट भरल्याची भावना टिकून राहते आणि अनावश्यक खाणे टाळता येते.