Raw banana benefits: पिकलेल्या केळ्यांपेक्षा कच्ची केळीच भारी! जाणून घ्या आरोग्यासाठीचे फायदे

पुढारी वृत्तसेवा

आपल्याला पिकलेली केळी खायला आवडतात, पण तुम्हाला माहीत आहे का की, कच्ची केळी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतात?

banana | file photo

कच्च्या केळीचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. चला तर मग जाणून घेऊया, कच्चे केळी खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय लाभ होतात:

Bananas | Pudhari

पचनक्रिया सुधारते

कच्च्या केळीमध्ये 'रेझिस्टंट स्टार्च' भरपूर प्रमाणात असतो, जो प्रीबायोटिक म्हणून कार्य करतो. हा घटक आतड्यांमधील चांगल्या जिवाणूंना पोषण देतो, ज्यामुळे पचनतंत्र अधिक मजबूत आणि सुरळीतपणे काम करते.

Bananas | Pudhari

साखर नियंत्रणात राहते

कच्च्या केळीमध्ये असणारा रेझिस्टंट स्टार्च शरीरात अत्यंत हळूहळू पचतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

म्हणूनच, मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी किंवा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी कच्ची केळी हा एक उत्तम आहार मानला जातो.

आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

कच्च्या केळीतील रेझिस्टंट स्टार्च आतड्यांमध्ये आरोग्यदायी जिवाणूंची वाढ वेगाने घडवून आणतो. निरोगी आतड्यातील मायक्रोबायोम केवळ पचनासाठीच नव्हे, तर आपली रोगप्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो.

पोटाच्या विकारांवर फायदेशीर

पिकलेली केळी अधिक गोड असतात आणि त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, तर कच्च्या केळ्यांमध्ये साखरेचे प्रमाण कमी आणि रेझिस्टंट स्टार्चचे प्रमाण जास्त असते. परिणामी, कच्च्या केळ्यांमुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळण्यासह विविध आरोग्य फायदे मिळतात.

मूड सुधारण्यास मदत

केळीमध्ये अनेक असे गुणधर्म आढळतात, जे ताणतणाव कमी करून तुमचा मूड फ्रेश आणि उत्तम ठेवण्यास मदत करतात.