Pineapple Health Benefits: अननस खाण्याचे 'हे' फायदे माहीत आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

चवीला आंबट-गोड आणि आरोग्यासाठी वरदान ठरणारे फळ म्हणजे अननस!

अननस बाहेरून टोचणारा आणि रानटी दिसत असला, तरी आतून मात्र मधुर ओलावा आणि खास चवीने परिपूर्ण असतो. म्हणूनच आहारात याचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.

शरीरात पाण्याची कमतरता भासू नये असं वाटत असेल, तर अननस हा उत्तम पर्याय आहे. हे फळ शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवते.

अननस केवळ चविष्टच नाही, तर यात भरपूर पोषक घटक आहेत. जे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपकारक ठरतात.

अननसामध्ये भरपूर प्रमाणात 'क' जीवनसत्त्व असते, जे मौसमी आजारांशी लढण्यास शरीराला मदत करते.

शरीर दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासोबतच अननस पचनक्रिया सुधारण्यासाठी अत्यंत साहाय्यभूत ठरतो.

अननसातील कॅल्शियम आणि मँगेनिज हाडांच्या व स्नायूंच्या त्रासांवर गुणकारी ठरते. याच्या सेवनाने लहान-मोठी हाडे मजबूत होतात.

अननसातील तंतुमय घटक कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

अननस खाल्ल्याने शरीराचे मेटॅबॉलिजम सुधारते. यामुळे चयापचय प्रक्रिया वेगवान होऊन पोटाची वाढलेली चरबी आणि वजन कमी होण्यास मदत होते.

आपल्या ‘डाएट’विषयी संवेदनशील असणाऱ्यांना अननस खाण्याचा सल्ला आवर्जून दिला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.