Dates : चमकदार त्वचा आणि निरोगी पचनासाठी रोज खा खजूर...

पुढारी वृत्तसेवा

खजूर खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

खजुराच्या सेवनाने शरीरातील थकवा दूर होतो.

खजूरमधील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते, आतड्यांचे आरोग्य सुधारते. 

यामध्ये असलेले पोटॅशियम-मॅग्नेशियम कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत करते.

खजूरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन 'के' असल्याने हाडांची मजबुती वाढवण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त.

खजूरमधील अँटीऑक्सिडंट्स-व्हिटॅमिन बी६ मेंदूचे कार्य सुधारतात,  स्मरणशक्ती वाढविण्यात मदत करतात.

खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत.

व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे खजूर त्वचेवरील सुरकुत्या कमी करून त्वचेला नैसर्गिकरित्या तजेलदार बनवतात.

खजूरमधील लोह, जीवनसत्त्वे, खनिजे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.