Drinking Water Technique: सूर्योदयापूर्वी ९० मिनिटे आधी पाणी पिल्याने काय होते?

Anirudha Sankpal

सूर्योदयापूर्वी सुमारे ९० मिनिटे आधी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर पाणी पिणे ही शरीरासाठी दिवसातील पहिली सर्वोत्तम औषधी आहे.

drinking water | pudhari photo

उषःपानामुळे शरीरातील साचलेले विषारी घटक (Toxins) बाहेर पडतात आणि पचनशक्ती वाढून जठराग्नि प्रदीप्त होतो.

एका वेळी साधारण ६४० मिली कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी बसून सावकाश पिणे ही योग्य पद्धत आहे.

canva

कफ प्रकृतीच्या लोकांनी तांब्याच्या पात्रातील, तर पित्त प्रकृतीच्या लोकांनी चांदीच्या किंवा मातीच्या भांड्यातील पाणी प्यावे.

जाणून घ्या, गरम पाणी पिण्याचे अफलातून फायदे | File Photo

तांब्याच्या भांड्यातील पाणी सर्वांनाच चालते हा गैरसमज असून, पित्त प्रकृती असलेल्यांनी किंवा मधुमेही रुग्णांनी तांब्याचा वापर जपून करावा.

Drinks For Belly Fat | Canva

उषःपानामुळे गॅस, अपचन आणि पोटाची सूज कमी होते, तसेच त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

warm drinkinng water

पाणी प्यायल्यानंतर लगेच झोपू नये; त्याऐवजी थोडा वेळ चालणे, ध्यान किंवा प्राणायाम करणे अधिक फायदेशीर ठरते.

warm drinkinng water

प्लास्टिकच्या बाटलीत ठेवलेले किंवा फ्रीजमधील अति थंड पाणी उषःपानासाठी कधीही वापरू नये.

how much water to drink in winter

ज्यांना रात्री जड जेवण झाल्यामुळे अपचन झाले आहे किंवा वारंवार लघवीचा त्रास आहे, त्यांनी पाण्याचे प्रमाण आणि तापमान वैद्यांच्या सल्ल्यानुसार संतुलित ठेवावे.

Ayurveda Water During Meals | pudhari photo