पुढारी वृत्तसेवा
नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचा स्रोत
नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम असतात, जे उन्हाळ्यात शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवतात.
डिहायड्रेशन टाळते
जास्त घामामुळे शरीरातील पाणी कमी होतं. नारळ पाणी त्वरीत हायड्रेशन देते.
पित्त शांत ठेवते
उन्हाळ्यात पित्त वाढण्याची शक्यता असते. नारळ पाणी शरीराला नैसर्गिक थंडावा देते.
पचन सुधारते
हलके आणि सहज पचणारे असल्यामुळे गॅस, अॅसिडिटी कमी करण्यास मदत होते.
त्वचेसाठी फायदेशीर
नियमित सेवन केल्यास त्वचा हायड्रेट राहते आणि नैसर्गिक चमक टिकून राहते.
कॅलरी कमी असतात
सॉफ्ट ड्रिंक्सच्या तुलनेत नारळ पाण्यात कॅलरी कमी असतात, त्यामुळे वजन नियंत्रणासाठी योग्य पर्याय आहे
ऊर्जा वाढवते
थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्यास नारळ पाणी ताजेतवाने करते.
रक्तदाब नियंत्रणात मदत
पोटॅशियममुळे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते.
किती प्रमाणात प्यावे?
दिवसाला 1 ते 2 ग्लास नारळ पाणी पुरेसे आहे. जास्त प्रमाणात घेतल्यास साखरेची पातळी लक्षात ठेवावी.