Chikoo for Acidity Remedy: आम्लपित्तासाठी खास आयुर्वेदिक उपाय: 'या' पद्धतीने लोण्यात भिजवलेला चिकू खा!

पुढारी वृत्तसेवा

आम्लपित्ताने हैराण आहात? तर चिकू तुमच्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो. पण तो खाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे.

पित्तविकारावर असा करा वापर

  • साल काढून चिकूच्या ४ फोडी करा.

  • या फोडी रात्रभर लोण्यात भिजत ठेवा.

  • सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

चिकूमध्ये भरपूर कॅरोटीन असल्याने लहान मुलांना फार उपयुक्त आहे. चिकू रुचकर असून तापाच्या रुग्णास जेव्हा तोंडास चव नसते, अशा वेळी हितकर ठरतो.

झाडापासून जो पांढऱ्या रंगाचा चीक मिळतो, त्याचा चिकलेट, बबलगम, च्युइंगम बनविताना मूलतत्त्व म्हणून वापर करतात.

लघवीची जळजजळ होत असल्यास : दिवसातून २-३ चिकू साखर लावून खावेत

धातुपुष्टीस : नूसता चिकू हितकर.

आतड्यांची शक्ती वाढण्यास : नियमितपणे चिकू खावेत.

हाताच्या शस्त्रक्रियेत : "ट्रान्समिशन बेल्टस" बनविण्यासाठी झाडापासून मिळणारा सफेद चिक वापरतात.

चिकू पिकलेलाच खावा, कच्चा खाऊ नये. कच्चा चिकू खाण्याने मलावरोध होऊन पोटात दुखते. नीट न चावता किंवा जास्त प्रमाणांत चिकू खाल्ले असता पोटाला जड पडतात.