पुढारी वृत्तसेवा
केळीचे फूल हे अनेक पोषक तत्वांचा आणि औषधी गुणधर्मांचा नैसर्गिक खजिना आहे.
यात असलेल्या मुबलक अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
मधुमेहींसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास हे अत्यंत गुणकारी ठरते.
महिलांच्या मासिक पाळीतील समस्या आणि पीसीओएस (PCOS) वर केळीचे फूल फायदेशीर आहे.
यात लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने ॲनिमिया किंवा रक्ताल्पतेवर हे मात करते.
पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि बोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी याचा आहारात समावेश करावा.
वजन कमी करण्याच्या प्रवासात केळीचे फूल हे एक उत्तम नैसर्गिक 'सुपरफूड' आहे.
तणाव कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य जपण्यास देखील 'केळीचे फुल' मदत करते.