पुढारी वृत्तसेवा
निरोगी आणि सुदृढ़ राहण्यासाठी प्रत्येकजण योग्य आहार घेत असतात. त्याचबरोबर शरीरात रक्ताची पातळी नीट राखणे देखील खूप गरजेचे आहे.
अशातच आपल्या शरीरात लोहाची कमतरता जाणवल्यास अशक्तपणासारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.
यासाठी योग्य आहारासोबत काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी काही पदार्थ उपयुक्त ठरतात असे आहारतज्ज्ञ सांगतात.
पालक : लोहयुक्त पदार्थांमध्ये पालक हे नाव सर्वात आधी लक्षात येते. शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यासाठी एक उत्तम स्रोत मानले जाते.
हेल्थलाईनच्या मते १०० ग्रॅम पालकामध्ये सुमारे २.७ ग्रॅम लोह असते. पालक भाजीच्या सेवनाने शरीरात रक्त जलद वाढवण्यास मदत होते.
डाळी : मूग, मसूर, तूरडाळ आणि चणा डाळ हे देखील लोहाचे चांगले स्रोत आहेत.
एक कप कच्च्या डाळीमध्ये सुमारे ६.६ ग्रॅम लोह आढळते, जे शरीरात रक्त वाढवण्यास खूप मदत करते.
चणे : तुम्ही जर शाकाहारी असाल तर तुम्ही तुमच्या आहारात चणे देखील समाविष्ट करू शकता.
लोहाव्यतिरिक्त, चण्यांमध्ये प्रथिने आणि फायबरचा एक उत्कृष्ट स्रोत देखील आहे.
डाळिंब : शरीरात रक्त वाढवण्यासाठी डाळिंब हा एक उत्तम स्रोत आहे. १०० ग्रॅम डाळिंबाच्या बियांमध्ये ०.३१ मिलीग्राम लोह आढळते.
दररोज एक डाळिंब खाल्ल्याने रक्त वाढवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. लोहाव्यतिरिक्त डाळिंबात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंटस् आणि अनेक पोषक घटक आढळतात.
संपूर्ण धान्य : नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते संपूर्ण धान्य देखील लोहाचा एक चांगला स्रोत आहे.
तुम्ही तुमच्या आहारात ओटस्, क्विनोआ, बाजरी आणि लाल तांदूळ यांचा समावेश करू शकता.
फोर्टिफाइड पदार्थ : संपूर्ण धान्यांव्यतिरिक्त शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी फोर्टिफाइड पदार्थ देखील एक चांगला पर्याय आहे.