head massage : ठंडा ठंडा कुल कुल, डोक्याला मालिश करणे किती फायदेशीर!

Namdev Gharal

‘सर जो तेरा चकराये’ नावाचे तेल मालिश वर जॉनी वॉकर यांचे एक गाणे प्रसिद्ध आहे. तर तेल मालिश, डोक्याची चंपी करणे आरोग्यासाठी किती फायदेशिर ठरते ते पाहू

डोक्याला तेल मालिश करणे हा उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा मानसिक ताण कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. यामुळे डोक्याला कमालीची शांतता मिळते, डोकं हलकं होतं आणि रात्री झोपही छान येते.

थंड तेलामध्ये पुदिना आणि कापूर यांसारखे घटक असतात. जेव्हा तुम्ही या तेलाने डोक्याला हलक्या हाताने मसाज करता, तेव्हा डोक्याकडचा रक्तप्रवाह सुधारतो.

रक्तप्रवाह सुधारल्यामुळे यामुळे मेंदूला शांतता मिळते आणि दिवसभराचा मानसिक थकवा किंवा स्ट्रेस मिनिटांत गायब होतो.

उष्णतेमुळे किंवा अपुऱ्या झोपेमुळे डोकं दुखत असेल, तर थंड तेलाची मालिश खूप गुणकारी ठरते. पुदिनाचा 'कूलिंग इफेक्ट' कपाळाच्या नसांना रिलॅक्स करतो, ज्यामुळे डोकेदुखीची तीव्रता झपाट्याने कमी होते.

जर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत झोप येत नसेल किंवा अस्वस्थ वाटत असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे थंड तेलाने डोक्याची मालिश करा. यामुळे शांत, गाढ झोप लागण्यास मदत होते.

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरात आणि डोक्यात उष्णता वाढते. थंड तेल डोक्याच्या त्वचेला थेट थंडावा देते, ज्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते आणि उन्हाचा त्रास कमी होतो.

बाजारात मिळणारया तेलापेक्षा घरीच खोबरेल तेलात कापूर मिसळून तुम्ही मालिशचे तेल तयार करु शकता हे तेल डोक्याला लावल्याने खूप थंडावा मिळतो आणि कोंडाही कमी होतो.

खोबरेल तेलात पुदिनाचे काही थेंब पेपरमिंट इसेन्शियल ऑइल मिक्स करा. पुदिनामुळे डोक्याला "कुल कुल" इफेक्ट मिळतो.

मालिश करण्याची योग्य पद्धत म्हणजे बोटांच्या टोकांनी नखे न लावता मालिश करा डोक्यात गोलाकार व प्रेशर पॉईंट दाबत हलक्या हाताने मसाज करणे