पुढारी वृत्तसेवा
67 वर्षे एकाच हॉटेलमध्ये राहिला!
एका व्यक्तीची भन्नाट कहाणी सध्या व्हायरल होत आहे.
कोण आहे हा व्यक्ती?
जीन ले बॉन नावाचा हा ट्रॅव्हलिंग सेल्समन होता.
कुठे केली होती ‘चेक-इन’?
पॅरिसमधील प्रसिद्ध इंटरकॉन्टिनेंटल पॅरिस ले ग्रँड हॉटेलमध्ये.
सुरुवात कशी झाली?
1957 मध्ये काही दिवसांसाठी रूम बुक केली होती.
मग काय झालं?
हॉटेल इतकं आवडलं की तेच त्याचं कायमचं घर बनलं.
किती काळ राहिला?
तब्बल 67 वर्षे तो त्या हॉटेलमध्येच राहिला.
हॉटेलचं घरात रूपांतर
रूम सर्व्हिस, जेवण आणि वातावरणामुळे त्याने तिथेच आपलं विश्व उभारलं.
कर्मचारी झाले कुटुंब
हॉटेल स्टाफ त्याच्यासाठी घरच्यांसारखे झाले होते.
शेवटी किती बिल आलं?
2024 मध्ये चेक-आउट करताना अंदाजे 21 कोटी रुपयांचं बिल!