घरात आरसा चुकीच्या दिशेला लावलात? होऊ शकतात मोठे वास्तुदोष

पुढारी वृत्तसेवा

वास्तुशास्त्रानुसार घरात आरसा कुठे लावावा आणि त्याचा आकार कसा असावा हे खूप महत्त्वाचे आहे.

चुकीच्या दिशेला लावलेला आरसा घरात अडचणी आणि नकारात्मकता आणू शकतो.

वास्तुशास्त्रानुसार घरात गोल आकाराचे आरसे वापरू नयेत. हे अशुभ मानले जाते. यामुळे मानसिक गोंधळ आणि आयुष्यात अस्थिरता येते.

ऐवजी आयताकृती किंवा चौकोनी आरसे शुभ मानले जातात जे घरात स्थिरता आणि संतुलन आणतात.

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा, पश्चिम दिशा आणि दक्षिण-पूर्व दिशांच्या भिंतींवर आरसा लावणे खूप अशुभ मानले जाते. त्‍यामुळे घरातील ऊर्जा असंतुलित होते. घरात तणाव, वाद आणि मानसिक अस्वस्थता निर्माण होउ शकते.

घराच्या उत्तर दिशेला लावलेला आयताकृती किंवा चौकोनी आरसा पैशांची वाढ होण्यास मदत करतो.

वास्तुशास्त्रानुसार तुटलेला आरसा अत्यंत अशुभ मानला जातो. असे मानले जाते की तुटलेल्या आरशातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते.

बेडरूममध्ये आरसा लावल्यास पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात.

आरशात ही पलंग किंवा झोपलेली व्यक्ती दिसू नये. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

घरातील मुख्य दरवाजासमोर आरसा लावणे टाळावे. कारण यामुळे घरात येणारी सकारात्मक ऊर्जा परत जाते अशी धारणा आहे.