वडिलांचे वय ५० पेक्षा अधिक आहे, या गोष्टींची घ्या काळजी

मोहन कारंडे

वयाच्या ५० नंतर शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजांची गरज भासते. त्यांच्या कमतरतेमुळे शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होऊ लागते.

फादर्स डे निमित्ताने त्या पोषक तत्वांबद्दल जाणून घेऊया, ज्यांचा समावेश 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक वडिलांच्या आहारात असणे आवश्यक आहे. 

कॅल्शियम : ५० पेक्षा अधिक वयाच्या महिला आणि ७० पेक्षा अधिक वयाच्या पुरुषांनी इतर प्रौढांपेक्षा सुमारे २०% जास्त कॅल्शियम घेतले पाहिजे. यासाठी आहारात दूध, दही आणि चीज अवश्य घ्या.

व्हिटॅमिन बी 12 : हे रक्त आणि चेतापेशी तयार करण्यास मदत करते. मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांपासून मिळवता येते.

व्हिटॅमिन डी : वयानुसार सूर्यप्रकाशाचे व्हिटॅमिन डी मध्ये रूपांतर करण्याची शरीराची क्षमता कमी होते. सॅल्मन, मॅकेरल आणि सार्डिन यांसारखे फॅटी मासे त्याचे चांगले स्त्रोत आहेत.

फायबर : वयोमानानुसार फायबर शरीरासाठी अधिक महत्त्वाचे बनते. फायबर स्ट्रोकच्या धोक्यापासून वाचवते. ते धान्य आणि भाज्यांमधून मिळू शकते.

ओमेगा ३ : हे फॅटी अॅसिड्स खूप महत्त्वाचे मानले जातात, कारण तुमचे शरीर ते बनवू शकत नाही. यासाठी अक्रोड, कॅनोला तेल किंवा जवस यांचा आहारात समावेश करा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here