Hanuman photo vastu tips: घरात हनुमानाचा फोटो कोणत्या दिशेला लावावा?

पुढारी वृत्तसेवा

अनेकजण घरात हनुमानाची प्रतिमा लावतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार ती नेमक्या कोणत्या दिशेला असावी, याचे काही विशेष नियम आहेत.

वास्तुशास्त्रानुसार, घरात हनुमानाचा फोटो लावण्यासाठी उत्तर दिशा अत्यंत शुभ मानली जाते. उत्तर दिशेला यम आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो, असे मानले जाते.

यामुळे घरात भूत-प्रेत, भीती किंवा कोणत्याही वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही. यामुळे कुटुंबातील सदस्यांवर हनुमानाची कृपादृष्टी राहते आणि घरात सुख-शांती नांदते.

हनुमानाचा फोटो कधीही बेडरूममध्ये लावू नये. असे केल्याने हनुमान रुष्ट होऊ शकतात आणि व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, अशी धारणा आहे.

घराच्या शिड्यांखाली किंवा अडगळीच्या ठिकाणी फोटो लावणे टाळावे.

घरात हनुमानाचा बसलेल्या स्थितीतील फोटो लावणे अत्यंत फलदायी मानले जाते. यामुळे जीवनातील अडथळे दूर होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते.

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा योग्य दिशेला 'पंचमुखी हनुमानाचा' फोटो लावल्याने वाईट शक्तींचा नाश होतो आणि आशीर्वाद सदैव पाठीशी राहतो.