Hantavirus: उंदरांपासून पसरतोय जीवघेणा 'हंता' व्हायरस; जाणून घ्या लक्षणे

पुढारी वृत्तसेवा

उंदीर आणि घुशींपासून मानवामध्ये पसरणाऱ्या घातक हंता व्हायरसने आता जगाचे टेन्शन वाढवले आहे.

Mice prevention tips

हा विषाणूंचा एक गट असून हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम (एचपीएस) हा फुफ्फुसांवर परिणाम करतो.

Lungs

हेमोरेज फिव्हर विथ रिनल सिंड्रोम (एचएफआरएस) हा ताप आणि मूत्रपिंडावर परिणाम करतो व युरोप आणि आशियात आढळतो.

असा होतो प्रसार

हा विषाणू थेट उंदीर, घुशी किंवा शेतातील उंदरांपासून मानवाकडे येतो.

Mice

जेव्हा उंदरांच्या विष्ठेमध्ये किंवा मूत्रात असलेला विषाणू हवेत मिसळतो आणि त्या हवेत श्वास घेतो, तेव्हा हा विषाणू शरीरात जातो.

Mice prevention tips

लक्षणे : ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजणे, मळमळ, उलट्या, जुलाब, नंतर तीव्र श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

असा झाला 'हंता'चा उद्रेक

एक प्रवासी अर्जेंटिना आणि चिलीमध्ये प्रवास करून क्रूझवर चढला.

६ एप्रिल रोजी लक्षणे दिसली, ११ एप्रिल रोजी मृत्यू.

२ मे रोजी 'डब्ल्यूएचओ'ला माहिती मिळाली.

जहाजावरील जवळच्या संपकर्षांद्वारे इतरांना लागण झाली.

काही रुग्ण सेंट हेलेना येथे उतरून दक्षिण आफ्रिकेत विमानाने गेले.