Namdev Gharal
व्हिएतनाम (Vietnam) देशातील फॉंग न्हा-कें बांग या राष्ट्रीय उद्यानात ही गूहा आहे.
स्थानिक शिकार्याने 1990 मध्ये ही गुहा शोधली होती, पण 2009 मध्ये ब्रिटीश केव्ह एक्सप्लोरेशन टीमने अधिकृतपणे तिचा अभ्यास केला.
या गुहेतून अतिशय सुंदर भूमिगत नदी वाहते, त्यामुळे तिला Mountain River Cave असेही म्हणतात.
गुहेच्या आतील भागात प्रकाश पोहोचतो अशा मोठ्या भागांमध्ये स्वतंत्र ‘जंगल’ आणि जैवविविधता तयार झाली आहे.
या गुहेत स्वतंत्र इकोसिस्टिम आहे. काही ठिकाणे ही एखाद्या आकाशगंगेसारखी दिसतात
गुहेतील वातावरणात बाष्प आणि आर्द्रतेमुळे वादळी ढग निर्माण होतात, हे अत्यंत दुर्मिळ आहे.
यामध्ये हिरवीगार जंगले, इतरत्र न सापडणारे जीव- जंतू अज्ञात प्रजाती सापडतात.
गुहेतील स्टॅलेक्टाइट्स आणि स्टॅलेग्माइट्स (स्फटिक खडकांच्या रचना) खूप मोठ्या आणि सुंदर असून हजारो वर्षांच्या प्रक्रियेत तयार झालेल्या आहेत.
ही गुहा अगदी मर्यादित पर्यटकांसाठी पाहण्यासाठी सोडण्यात येते
ही आकाराने व खोलीच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी नैसर्गिक गुहा आहे.