Hair Health Diet: भात खाल्ल्याने केस गळतात की वाढतात? तज्ज्ञांचा सल्ला
पुढारी वृत्तसेवा
सुंदर आणि लांबसडक केस ही केवळ जनुकीय देणगी नसून ती आपल्या आहारावरही अवलंबून असते.
hair care
याच पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी केसांच्या आरोग्यासाठी आहार टिप्स सांगितल्या आहेत.
Hair Fall Ayurvedic remedy | file photo
ऋजुता यांच्या मते, शरीराचे आरोग्य आणि केसांचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहे.
Hair Growth
वजन कमी करण्याच्या नादात 'डाएट' करताना अनेकजण भात किंवा कर्बोदके पूर्णपणे बंद करतात. मात्र, अशा प्रकारे वजन घटल्यास केसांची संख्याही घटते, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Hair Oils for Growth | file photo
त्यांनी दिवसातून किमान एकदा भात खाण्याचा सल्ला दिला असून, भात खाल्ल्याने वजन वाढत नाही, उलट केसांच्या मजबुतीसाठी ते आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
Hair Fall | file photo
१. पेरू आणि आवळा यांसारखी 'व्हिटॅमिन सी'ने समृद्ध फळे खावीत.
Amla Moringa Shots | Canva
२. मूग, तुरीची डाळ आणि विविध कडधान्ये दिवसातून एकदा तरी आहारात असावीत.
३. केसांसाठी अळीव अत्यंत फायदेशीर आहे. अळीव लाडू किंवा खिरीच्या स्वरूपात खावेत, जेणेकरून त्यातील फॉलिक ॲसिड आणि पोषक तत्वे शरीर शोषून घेऊ शकेल.
४. आठवड्यातून किमान एकदा केसांना तेल लावा आणि धुण्यापूर्वी ३० मिनिटे ते राहू द्या. नियमितपणे केस विंचरा आणि त्यातील जटा काढा.