Hair Growth : केसांच्या नैसर्गिक वाढीसाठी ५ जादूई वनस्पती!

पुढारी वृत्तसेवा

केसांच्या उत्तम आरोग्यासाठी दरवेळी महागड्या प्रॉडक्ट्सची गरज नसते! तुमच्या घरात सहज मिळणाऱ्या वनस्पती ठरू शकतात सर्वोत्तम.

रोझमेरी अनेक वर्षांपासून केसांच्या निगेसाठी वापरली जाते. यामुळे केस मजबूत होतात आणि केस गळती कमी होण्यास मदत होते.

मूठभर रोझमेरी पाने खोबरेल तेलात उकळून घ्या. थंड झाल्यावर टाळूला हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर ठेवून सकाळी केस धुवा.

जास्वंदाच्या फुलांमध्ये अमिनो ॲसिड मुबलक असते, जे केसांमधील मुख्य घटक असलेल्या 'केराटिन'च्या निर्मितीस प्रोत्साहन देते.

जास्वंदाची ताजी फुले वाटून घरगुती हेअर मास्क बनवा. आठवड्यातून एकदा लावून केस मजबूत आणि चमकदार बनवा.

कोरफड कोरड्या आणि संवेदनशील टाळूसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ही वनस्पती केसांना नैसर्गिक ओलावा (Moisture) देते.

कोरफडीचा ताजा गर थेट टाळूला आणि केसांना लावा. यामुळे टाळूची जळजळ कमी होऊन केस मऊ व ताजेतवाने राहतात.

कढीपत्त्यात प्रथिने (Proteins) आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे केस अकाली पांढरे होणे आणि पातळ होणे थांबते.

पुदिन्यामुळे टाळूतील रक्ताभिसरण सुधारते. शॅम्पूनंतर पुदिन्याच्या पाण्याने केस धुतल्यास केसांमध्ये ताजेपणा टिकून राहतो.

केमिकलमुक्त आणि सोपे घरगुती उपाय अपनावा. या ५ वनस्पतींच्या नियमित वापराने मिळवा दाट, चमकदार आणि निरोगी केस!