Hair Fall: शॅम्पूमध्ये मिसळा चहा पावडर! फक्त दोन वापरांत केस गळती होईल कमी

पुढारी वृत्तसेवा

आजकाल केस गळती ही मोठी समस्या बनली आहे. केस जास्त गळू लागले की अनेक लोक शॅम्पू करायलाच घाबरतात.

Hair Oils for Growth

जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमचे केस खूप गळत आहेत आणि भविष्यात टक्कल पडू शकतं, तर घाबरू नका. यासाठी केसांची काळजी घेण्याची पद्धत बदलायची आहे.

Hair Growth

आतापर्यंत तुम्ही वेगवेगळे केमिकलयुक्त प्रोडक्ट्स वापरत असाल, तर आता त्याऐवजी घरात सहज मिळणाऱ्या नैसर्गिक गोष्टी वापरून पाहू शकता.

Hair Growth

हा घरगुती उपाय हेल्थ कोच शिवांगी देसाई यांनी त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओत सांगितला आहे.

या उपायासाठी लागणारे साहित्य :

चहापत्ती, शॅम्पू, मेथी दाणे, कढीपत्याची पाने

(साहित्याचे प्रमाण आपल्या गरजेनुसार घ्या.)

उपाय तयार करण्याची पद्धत

एका पॅनमध्ये पाणी गरम करा. त्यात चहापत्ती टाकून पाणी चांगलं उकळू द्या. त्यानंतर शॅम्पू, मेथी दाणे आणि कढीपत्ते टाका. सर्व साहित्य नीट उकळून घ्या.

मिश्रण थंड झाल्यावर पाणी गाळून बाटलीत भरून ठेवा. आता तुमचा केसांसाठी फायदेशीर घरगुती उपाय तयार आहे.

कसा वापरायचा?

हा तयार केलेला सीरम आठवड्यातून दोन वेळा केसांवर वापरू शकता.

Hair Oils for Growth | file photo

याचे फायदे काय?

केस गळती कमी होण्यास मदत

केसांची वाढ होण्यास मदत

केस सिल्की आणि स्मूथ होतात

केस मुळापासून मजबूत होतात

Hair Growth

या लेखातील माहिती इंस्टाग्रामवर प्रकाशित व्हिडिओवर आधारित आहे. कोणताही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Hair Growth