Guru Gochar : धनत्रयोदशीला गुरु गोचर, ‘या’ राशींचे भाग्य उजळणार! तुम्हाला होणार का लाभ?

पुढारी वृत्तसेवा

यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी एक विशेष ज्योतिषीय घटना घडणार आहे.

१८ ऑक्टोबर २०२५ रोजी गुरु ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल.

ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला शिक्षण, संतती, भाग्य, संपत्ती आणि समृद्धी यांचा कारक मानले जाते.

यंदा गुरु ग्रहाचे गोचर दिवाळी सणाची सुरुवात करणाऱ्या धनत्रयोदशीच्या दिवशी होत असल्यामुळे त्याचा प्रभाव अधिक शुभ मानला जात आहे.

दिवाळीत कर्क राशीतील गुरु संक्रमण कोणत्या राशींना लाभदायक ठरेल, ते पाहूया.

वृषभ राशीच्या जातकांच्‍या संवाद कौशल्यासह आत्मविश्वासात वाढ होईल. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. प्रवासातून लाभाचे योग. लेखन किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधितांसाठी हा काळ उत्कृष्ट ठरेल.

सिंह राशीच्या जातकांच्‍या धन व आत्मविश्वासात वाढ होईल. गुंतवणुकीतून लाभ मिळेल. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळेल. कुटुंबात आनंदी व धार्मिक वातावरण राहील.

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी भाग्यवृद्धीचे योग बनतील. परदेश प्रवास, उच्च शिक्षण संबंधित कामांमध्ये प्रगती होईल. कुटुंबातील सलोखा कायम राहील.

मीन राशीच्‍या जातकांना संततीसुख लाभेल. प्रेमजीवन अधिक मजबूत होईल. कलावंत, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुवर्णसंधी देणारा ठरेल. धनलाभ आणि मान-सन्मानातही वाढ होईल.

येथे क्‍लिक करा.