पुढारी वृत्तसेवा
गुलाब बहुगुणी आहे, असं म्हणता येण्याइतपत पोषणतत्त्वं या फुलात एकवटली आहेत. गुलाब मानवी शरीराला थंडावा देण्याइतपत गुणकारी आहे.
हृदयासाठी बलकारक आहे. गुलाबाचं फूल पचनाला हलकं आणि रक्त शुद्ध करणारं आहे, असं मानलं जातं. त्याच्या मधुर रसात रक्तातील उष्णता कमी करण्याची क्षमता आहे.
जेवल्यावर पोट जड होऊन अनेकांना गॅस होतो, आंबट ढेकर येतात, छातीमध्ये जळजळतं, आग आग होते. काहींचे हातापायाचे तळवे जळजळल्यासारखे होतात. त्यांच्यासाठी गुलाब उपकारक मानला जातो.
गुलाबापासून तयार केला जाणारा गुलकंद आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाचा आहे. गुलकंद जर औषध म्हणून वापरायचा असेल तर हल्ली बाजारात तयार गुलकंद बर्याच ठिकाणी उपलब्ध असतो.
गुलकंदामुळे पोट साफ होण्यास मदत होते. कारण, तो एखाद्या रेचकाप्रमाणे काम करतो.
रक्तदोष, खरूज किंवा खाज गुलकंदामुळे दूर होऊ शकते.
कांजण्या किंवा गोवर आल्यानंतर शरीरातील उष्णता बाहेर काढण्यासाठी गुलकंद फायदेशीर मानला जातो.
भूक लागण्यासाठी आणि रक्तदाब नियमित व संतुलित ठेवण्यासाठीही गुलकंदाचं सेवन उपयुक्तठरतं.