International yoga day |योगाच्‍या नावे असणारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स तुम्‍हाला माहित आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

योगाच्या फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.

International Yoga Day 2025

२१ जून या दिवशी सूर्याची किरणे सामान्य दिवसांपेक्षा जास्त काळ पृथ्वीवर राहतात. या काळात योगासने करणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणूनच २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.

International Yoga Day 2025

संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये २०१४ मध्ये हा दिवस प्रस्तावित केला होता. २०२५ ची थीम 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' आहे.

योगा संदर्भातील आजवर अनेक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाले आहेत.

२१ जून २०२३ मध्‍ये सर्वात मोठा योग वर्ग हा गुजरातमधील सुरतमध्‍ये झाला. येथे तब्‍बल १, ४७ ९५२ जण सहभागी झाले होते.

सर्वाधिक राष्‍ट्राचे नागरिक योग कार्यक्रमात सहभागी झाले. हा कार्यक्रम दुबईमध्‍ये २३ जानेवारी २०२४ रोजी झाला होता.एमिरेट्स ग्रुपने १४४ राष्ट्रीयत्वांच्या कर्मचाऱ्यांसह योग वर्ग आयोजित केला होता.

सर्वाधिक काळ चालेला सलग चालेला योग वर्ग १०-१६ नोव्हेंबर २०१७ या काळात तामिळनाडूतील कांचीपुरममध्‍ये घेण्‍यात आला. हा वर्ग तब्‍बल १३८ तास १४ मिनिटे चालला

पंकज जैन यांनी १८ एप्रिल २०२४ रोजी दीड तासाहून अधिक काळ पाण्यात तरंगत योगासने करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला हाेता.

एप्रिल २०२४ मध्‍ये प्रदीप कुमार यांनी स्वतःला वामनासनात (शॉर्ट मॅन पोझ) १ तास २० मिनिटे ५ सेकंद स्थिर ठेवत नवा विक्रम केला हाेता.

२०२२ च्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनापूर्वी कतारमधील इंडियन स्पोर्ट्स सेंटरमध्ये ११४ देशांचे प्रतिनिधित्व करणारा योग वर्ग आयोजित करण्यात आला होता.

येथे क्‍लिक करा