Guinness World Record : ही मिरची ठरली जगातील सर्वात ‘लांब मिरची’

Namdev Gharal

गिनीज वल्र्ड रेकॉर्ड हे जगातील अदभूत गोष्टी मिळवणाऱ्या करणाऱ्या लोकांचा सन्मान करते. आता या रेकॉडमध्ये जगातील सर्वात लांब मिरचीचा समावेश झाला आहे

ही मिरची पिकवली आहे स्वित्झर्लंडचे ज्यूर्ग विसली यांनी ११ ऑगस्ट २०२६ रोजी स्वित्झर्लंडमधील थुरगाऊ येथील डोज़विल येथे तिची लांबी ५२.५ सेमी (१ फूट ८.६ इंच) नोंदवली गेली आहे.

ही मिरची "जोस लॉंग" (Joe's Long) या केयेन प्रकारातील मिरचीपासून पिकवण्यात आली होती. यासाठीचे बी विसली यांनी २०२५ मध्ये पिकवलेल्या ४८.५ सेमी (१ फूट ७ इंच) लांबीच्या मिरचीपासून घेतले होते

या मिरचीने विस्लीच्या 2018 मध्ये पिकवलेलया ५०.५ सेमीच्या मागील विक्रमालाही मागे टाकले. त्याचा यापूर्वीचा विक्रम जवळपास आठ वर्षे नाबाद राहिला होता. आठ वर्षांने विसली यांनी स्वताचाच विक्रम मोडीत काढला आहे

या जातीला आता "विसली बिग लॉंग" (Wiesli Big Long) म्हणून ओळखले जाते. मिरची ही 'कॅप्सिकम' (Capsicum annuum) प्रजातीतील आहे!

वैशिष्टये म्हणजे एका दशकात, सर्वात लांब मिरचीचा जागतिक किताब तीन वेळा मोडला गेला आहे. पण त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिन्ही उत्कृष्ट मिरच्या एकाच माणसाने म्हणजेच विसली यांनीच पिकवल्या आहेत

यापूर्वी जूर्ग यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला होता त्‍यावेळी त्‍यांनी 45-cm (1-ft 5.7-in) मिरची सादर केली त्‍यानंतर ऑक्टोबर 2018 मध्ये ५०.५ सेमी लाबिंच्या मिरचीचा रेकॉर्ड केला

मी मार्चमध्ये 28°C तापमानावर मिरचीचे बियाणे घरामध्ये वाढवतो. मग मी एप्रिलच्या शेवटी, दवा पडण्याचाचा धोका संपल्यावर तीच रोपे बागेत लावतो असे विस्ली यांनी सांगितले

रामायणातील जटायू