Gufi Paintal Passed Away: महाभारतातील 'शकुनी मामा' - गुफी पेंटल काळाच्या पडद्याआड

backup backup

स्वातंत्र्यापूर्वी अखंड भारताच्या पंजाबमधील तरण-तारण येथे 4 ऑक्टेबर 1944 ला त्यांचा जन्म झाला

गुफी पेंटल यांचे मूळ नाव सरबजित सिंग पेंटल असे होते. त्यांनी अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली होती.

गुफी यांना आर्मीत करिअरची इच्छा होती. 1962 मध्ये भारत-चीन दरम्यान ते आर्मीत भरती झाले पहिली पोस्टिंग आर्टिलरी येथे मिळाली

मनोरंजनासाठी बॉर्डरवर टीव्ही नसल्याने सेनाचे जवान रामलीला करत असे. त्यामध्ये ते सीतेची भूमिका करायचे

त्यांना अभिनयाची आवड होती. या माध्यमातून त्यांना अभिनयाची थोडी फार ट्रेनिंग देखील मिळाली

लहान भाऊ कंवरजीत पेंटल हे त्यावेळी चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते. त्याच्या सांगण्यावरून ते मुंबईत 1969 मध्ये आले

नंतर मॉडलिंग आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन अनेक चित्रपटात अभिनय तसेच असिस्टंट डायरेक्टरचे कामही त्यांनी केले

मात्र, त्यांना महाभारतातील शकुनीच्या भूमिकेने खरी ओळख मिळाली. ही भूमिका त्यांनी अजरामर केली

 याशिवाय त्यांनी अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका वठवल्या.

 .मात्र, त्यांना प्रेक्षकांनी शकुनी मामा म्हणूनच लक्षात ठेवले. 

रफू चक्कर, दिल्लगी, घुम हे त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्वाचे चित्रपट आहेत.

बहाद्दुर शाह जफर, कानून, सीआयडी, महाराणा प्रताप यासह अन्य धार्मिक पौराणिक मालिकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या...

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here