Gudi Padwa 2026: यावर्षी गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी? चुकूनही करू नका 'ही' चूक

पुढारी वृत्तसेवा

गुढीपाडव्याला गुढीला नवीन आणि भरजरी साडी नेसवण्याची परंपरा आहे. पण कोणता रंग निवडायचा? जाणून घ्या शास्त्रांनुसार कोणते रंग शुभ मानले जातात.

लाल रंग

हिंदू धर्मात लाल रंग सौभाग्याचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. कोणत्याही शुभ कार्यात या रंगाला विशेष महत्त्व असल्याने गुढीसाठी हा सर्वोत्तम रंग आहे.

केशरी रंग

मांगल्याचा आणि विजयाचा प्रतीक म्हणून केशरी (भगवा) रंग ओळखला जातो. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी हा रंग अतिशय शुभ मानला जातो.

हिरवा रंग

हिरवा रंग निसर्ग आणि समृद्धी दर्शवतो. सुवासिनींसाठी हा रंग सौभाग्याचे प्रतीक असल्याने गुढीचे सौंदर्य खुलवण्यासाठी हिरव्या रंगाची साडी नक्की वापरा.

पिवळा रंग

भगवान विष्णूंचा प्रिय रंग! हा रंग सकारात्मकता, प्रसन्नता आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. आध्यात्मिक दृष्टीने पिवळी साडी नेसवणे लाभदायक ठरते.

गुलाबी रंग

होळीचा गुलाल आणि आनंदाचे प्रतीक म्हणजे गुलाबी रंग. दिसायला उठावदार आणि मनमोहक असल्याने गुढीसाठी या रंगाची साडी तुम्ही वापरू शकता.

या रंगाची साडी चुकूनही नेसवू नका!

गुढीला कधीही काळ्या रंगाची साडी नेसवू नका. काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे शुभ कार्यात तो वर्ज्य आहे.

अशी सजवा तुमची गुढी

साडीसोबत खणाचा ब्लाऊज पीस, कडुनिंबाची डहाळी, फुलांचा हार आणि साखरेची माळ लावून तुमची गुढी भक्तीभावाने उभारा.