Green Peas Health Benefits : हिरव्या वाटाण्यामुळे शरीराला मिळतात 'हे' 10 भन्नाट लाभ

पुढारी वृत्तसेवा

हिवाळा सुरू होताच बाजारात ताज्या हिरव्या वाटाण्यांची आवक वाढते. चवीसोबतच आरोग्यासाठी हे छोटे दाणे वरदान आहेत. प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी याचे खास फायदे सांगितले आहेत.

जेवणाची चव वाढवणारा घटक

बटाट्याप्रमाणेच हिरवा वाटाणा तुम्ही कोणत्याही भाजीत घालू शकता. यापासून बटाटा-वाटाणा, गाजर-वाटाणा, मटर पनीर, पराठे आणि निमोना यांसारखे चविष्ट पदार्थ बनवले जातात.

फायबरचा उत्तम स्रोत

एक कप शिजवलेल्या हिरव्या वाटाण्यात सुमारे ९ ग्रॅम फायबर असते, जे तुमच्या दैनंदिन गरजेच्या ३१% इतके आहे. यातील विरघळणारे आणि न विरघळणारे फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवतात.

आतड्यांचे आरोग्य (Gut Health) सुधारते

हिरव्या वाटाण्यामध्ये फायबर आणि फर्मेंट होणारे कार्बोहायड्रेट्स असतात. हे घटक आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतात आणि 'शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड' तयार करून आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवतात.

लोहाची (Iron) कमतरता भरून काढते

अवघ्या १०० ग्रॅम शिजवलेल्या वाटाण्यात १.५ मिलीग्रॅम लोह (Iron) असते. विशेष म्हणजे यात व्हिटॅमिन-C देखील असल्याने शरीराला हे लोह सहजपणे शोषून घेण्यास मदत होते.

निरोगी DNA आणि पेशींच्या वाढीसाठी उपयुक्त

वाटाण्यामध्ये फोलेट (व्हिटॅमिन B9) मुबलक प्रमाणात असते, जे DNA निर्मिती आणि पेशींच्या विभाजनासाठी आवश्यक आहे. १०० ग्रॅम शिजवलेल्या वाटाण्यात सुमारे ६३ mcg फोलेट मिळते.

प्रोटीनचा जबरदस्त खजिना

एक कप शिजवलेल्या वाटाण्यात सुमारे ९ ग्रॅम प्रोटीन आणि ९ ग्रॅम फायबर असते. प्रोटीन आणि फायबरचे हे उत्तम कॉम्बिनेशन पोट दीर्घकाळ भरलेले ठेवण्यास मदत करते.

वाटाणे खाताना लिंबाचा वापर करा

हिरव्या वाटाण्यावर थोडा लिंबाचा रस पिळून खाल्ल्यास त्यातून अतिरिक्त व्हिटॅमिन-C मिळते. यामुळे वाटाण्यातील लोह शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते.

शिजवण्याची योग्य पद्धत आणि धान्याची जोड

वाटाणे जास्त वेळ उकळण्याऐवजी वाफवून (Steam) किंवा मायक्रोवेव्हमध्ये शिजवावेत, जेणेकरून त्यातील जीवनसत्त्वे टिकून राहतात. तसेच संपूर्ण धान्यासोबत (Whole Grains) खाल्ल्यास शरीराला अमिनो ॲसिड आणि जास्तीचे फायबर मिळते.

कोणी काळजी घ्यावी?

वाटाण्यातील फर्मेंट होणाऱ्या कार्बोहायड्रेट्समुळे काही जणांना गॅस किंवा पोट फुगण्याचा (Bloating) त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला IBS चा त्रास असेल किंवा आतडे संवेदनशील असतील, तर वाटाणे कमी प्रमाणात खाण्यास सुरुवात करा आणि हळूहळू प्रमाण वाढवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.