पुढारी वृत्तसेवा
जगात सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्टेशन अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आहे.
त्याचे नाव ग्रँड सेंट्रल टर्मिनल आहे.
याला जगातील सर्वात जास्त रेल्वे प्लॅटफॉर्म असण्याचे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले आहे.
हे टर्मिनल न्यूयॉर्कमधील पार्क अव्हेन्यू येथे आहे.
या स्टेशनवर दोन भूमिगत स्तरांवर 44 प्लॅटफॉर्म आहेत आणि हे एकूण 48 एकर क्षेत्रावर पसरलेले आहे.
या भव्य स्टेशनवरून दररोज सुमारे 660 गाड्या धावतात आणि सुमारे 1 लाख 25 हजार प्रवासी प्रवास करतात.
याच्या आकर्षक स्थापत्यकलेमुळे आणि भव्य मुख्य कॉनकोर्समुळे ते जगभर ओळखले जाते.
याशिवाय या स्टेशनमध्ये ट्रॅक 61 नावाचे एक गुप्त प्लॅटफॉर्म आहे, जो जवळच्या वाल्डोर्फ एस्टोरिया हॉटेलच्या खाली आहे.
असे मानले जाते की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी लोकांच्या नजरेतून वाचण्यासाठी या गुप्त प्लॅटफॉर्मचा वापर केला होता.