पुढारी वृत्तसेवा
वर्ष २०२५ संपत आले आहे. Google ने आपला वार्षिक 'ईयर इन सर्च' अहवाल जाहीर केला आहे.
यातून असे समोर आले आहे की, यावर्षी भारतात लोकांनी सर्वाधिक काय-काय सर्च केले. चित्रपट, क्रिकेट, बातम्या तर होत्याच, पण एका चीनी नंबरने सगळ्यांना आश्चर्यचकित केले.
तो नंबर ५२०१३१४ आहे. हा नंबर 'meaning' या श्रेणीत सर्वाधिक सर्च झाला. भारतातील मोठ्या संख्येने लोक हा नंबर सर्च करत राहिले.
Google Search च्या 'meaning'श्रेणीत या नंबरला पाचवे स्थान मिळाले आहे.
५२०१३१४ हा फक्त आकड्यांचा एक सामान्य कॉम्बिनेशन वाटू शकतो, परंतु प्रत्यक्षात यामागे एक खास आणि रोमँटिक अर्थ लपलेला आहे.
५२०१३१४ चा अर्थ काय आहे?
हा कोणताही सामान्य नंबर नाही. चीनी भाषेत, काही आकड्यांचा उच्चार शब्दांसारखा ऐकू येतो. यामुळे, भावना व्यक्त करण्यासाठी आकड्यांचा वापर करण्याची प्रथा तिथे खूप लोकप्रिय आहे
चीनी भाषेत ५२०१३१४ चा अर्थ 'मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करेन' असा आहे.
५२० : याचा उच्चार 'वो आई नी' म्हणजेच 'आय लव्ह यू' यासारखा होतो.
१३१४ : याचा उच्चार 'यी शेंग यी शी' यासारखा होतो, ज्याचा अर्थ 'संपूर्ण आयुष्य' असा आहे.
यामुळे ५२०१३१४ चा संपूर्ण अर्थ “मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करेन” असा होतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुण-तरुणींमध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी हा कोडवर्ड मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.