Namdev Gharal
निसर्गात इतके चमत्कार होत असतात की, काहीवेळा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही, असाच एक निसर्गचा चमत्कार असलेला किटक आपण पाहणार आहोत
हा किटक प्रथम पाहिला की वाटते एखादा सोन्याचे लॉकेट किंवा तुकडा पडला आहे का, पण हालचाल केल्यावर जाणवते की एक किटक आहे याला गोल्डन टॉर्टोइज बीटल (Golden Tortoise Beetle) असे म्हणतात
जेव्हा हा हा कीटक जिवंत आणि पूर्ण निरोगी असतो, तेव्हा तो एखाद्या चकाकणाऱ्या २0 -कॅरेट सोन्याच्या लॉकेटसासारखा किंवा सोन्याच्या दागिन्यासारखा दिसतो.
पण याच्या या गोल्डन रंगापाठीमागे शास्त्रिय कारण आहे. याची पाठ एका पारदर्शक 'कॅरापेस' (Carapace) नावाच्या कवचाने झाकलेली असते
'कॅरापेस' या कवचाखाली असलेल्या द्रवाच्या थरामुळे प्रकाशाचे परावर्तन होते आणि त्याला चकाकणारा सोनेरी रंग प्राप्त होतो.
दुसरे याचे वैशिष्ट्ये म्हणजे हा रंग बदलू शकतो जर त्याला कोणी स्पर्श केला किंवा त्याला धोका वाटला, तर तो आपला सोनेरी रंग बदलून लालसर-तपकिरी रंगाचा होतो.
हा कीटक अतिशय लहान असतो, साधारणपणे ५ ते ७ मिलिमीटर साधारणतः एका वाटाण्याच्या दाण्याएवढा
याचा आकार कासवासारखा (Tortoise) असतो, म्हणून याला 'टॉर्टोइज बीटल' म्हणतात.
हा प्रामुख्याने उत्तर अमेरिकेत आढळतो, परंतु जगाच्या काही इतर भागांतही याच्या प्रजाती दिसतात
हे कीटक प्रामुख्याने 'मॉर्निंग ग्लोरी' (Morning Glory) नावाच्या वनस्पतीची आणि रताळ्याच्या पानांवर जगतात