Namdev Gharal
पेंग्विन म्हटले की काळया पांढरया रंगाचा चकचकणारया पिसांचा व विषेश म्हणजे माणसासारखा चालणार पक्षी डोळयासमोर येतो
पण अंटलांटिक महासागरातील साउथ जॉर्जिया बेटावर एक दुर्मिळ 'पिवळा' किंग पेंग्विन दिसून आला आहे. याचे फोटो पाहून अनेकजण थक्क् झाले आहेत
हा गोल्डन रंगाचा पेंग्विन, इतर पेंग्विनपेक्षा पूर्णपणे वेगळा असून हा अतिशय सुंदर आहे याची छायाचित्रे सध्या व्हायरल होत आहेत.
बेल्जियन फोटोग्राफर इव्ह डम्स (Yves Adams) पेंग्विनच्या एका सामान्य वसाहतीचे फोटो टिपण्यासाठी गेले होते पण तिथे त्यांना एक असा पक्षी दिसला जो इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि उठून दिसत होता
हजारो काळ्या-पांढऱ्या किंग पेंग्विनच्या कळपात हा एकटाच पिवळ्या रंगाचा पेंग्विन आढळला
तज्ज्ञांच्या मते, हा 'अल्बिनिझम' Albinism चा प्रकार नाही, तर हा 'ल्युसिझम' (Leucism) नावाचा एक दुर्मिळ अनुवांशिक बदल आहे.
Leucism अनुवांशिक बदलामुळे पक्ष्याच्या शरीरातील नैसर्गिक रंगद्रव्ये (pigmentation) अंशतः कमी होतात, मात्र काही नैसर्गिक रंग शिल्लक राहतात.
याचा परिणाम म्हणजे, या पेंग्विनला हा अद्भूत सोनेरी-पिवळा रंग लाभला आहे. यामुळे समुद्रातील हा सर्वात पक्षी एखाद्या काल्पनिक पात्रासारखा भासत आहे.
या पेंग्विनच्या फोटोंनी सध्या इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.