Gold Ring Astrology : चुकीच्या बोटात सोन्याची अंगठी घालताय? पाहा काय सांगते तुमची रास!

पुढारी वृत्तसेवा

सुवर्ण केवळ शृंगाराचे साधन नाही, तर नशीब पालटणारी मोठी ताकद मानली जाते.

ज्योतिषशास्‍त्रानुसार, आपल्या हातातील प्रत्येक बोट वेगवेगळ्या खगोलीय ग्रहांचे प्रतिनिधित्व करत असते.

तर्जनी बोटामध्ये सोने परिधान केल्याने देवगुरु बृहस्पती बलवान होतात. भौतिक सुख, वैभव आणि बुद्धिमत्तेच्या प्रसारासाठी ही स्थिती अत्यंत शुभ मानली जाते.

विशेषतः मेष, सिंह आणि धनु राशीच्या जातकांसाठी तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी धारण करणे फायदेशीर ठरू शकते.

मध्यमेत सुवर्ण मुद्रिका घालताना विशेष काळजी बाळगावी लागते. न्यायदेवता शनीच्या प्रभावाखाली असलेल्या या बोटात सोने सर्वांनाच अनुकूल ठरते असे नाही.

अनामिका (रिंग फिंगर) हे बोट थेट सूर्य ग्रहाशी जोडलेले आहे. येथे सोने धारण केल्यामुळे समाजात मान-सन्मान, प्रसिद्धी आणि आत्मविश्वासात मोठी वाढ होते.

मिथुन, तुळ आणि कुंभ राशीच्या मंडळींनी अनामिका बोटात सोने घालणे लाभदायक मानले जाते.

करंगळी हे बुध ग्रहाचे बोट मानले जाते. बौद्धिक चमक वाढवण्यासाठी आणि व्यापारी क्षेत्रातघटक यश संपादन करण्यासाठी या ठिकाणी सोने परिधान केले जाते.

महत्त्वाची टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आणि उपलब्ध स्रोतांवर आधारित आहे. कोणताही धातू किंवा रत्न अंगावर धारण करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

येथे क्‍लिक करा.