पुढारी वृत्तसेवा
ऑफिस किंवा शाळेसाठी काचेच्या लंच बॉक्सचा वापर वाढला आहे. पण सततच्या वापरामुळे त्यात तेलकटपणा आणि दुर्गंधी जमा होते. 'या' काही सोप्या टिप्स वापरून डबा स्वच्छ करा.
१. कोमट पाणी आणि बेकिंग सोडा
काचेचा लंच बॉक्स साफ करण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा.
डब्यातील तेलकटपणा घालवण्यासाठी 'डिशवॉश लिक्विड'मध्ये १ चमचा बेकिंग सोडा मिसळा. हे मिश्रण चिकट भागावर लावा आणि काही वेळाने डबा घासून घ्या. यामुळे डाग आणि तेलकटपणा झटकन दूर होईल.
२. चहाच्या पानांचा वापर
चहा गाळून झाल्यानंतर उरलेली चहापत्ती फेकून दिली जाते. मात्र, या चहापत्तीचा वापर तुम्ही काचेची भांडी किंवा लंच बॉक्स स्वच्छ करण्यासाठी करू शकता.
यासाठी वापरलेल्या चहापत्तीमध्ये थोडे डिशवॉश लिक्विड मिसळा आणि त्याने डबा स्वच्छ करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने डबा धुऊन घेतल्यास काचेला छान चकाकी येते.
झाकणाची चिकट रबर पट्टी अशी करा साफ
लंच बॉक्सच्या झाकणाला बसवलेली रबर पट्टी स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात २ चमचे बेकिंग सोडा टाका.
या द्रावणात ती रबर पट्टी साधारण ५ मिनिटे भिजत ठेवा आणि नंतर स्वच्छ पुसून घ्या. यामुळे रबरवरील पिवळेपणा आणि तेलकट डाग सहज निघून जातील.
किंवा १ चमचा डिशवॉश लिक्विडमध्ये १ चमचा मीठ मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट रबरवर लावून काही वेळाने पाण्याने स्वच्छ धुवा.
'ही' काळजी घ्या
काचेचा लंच बॉक्स धुतल्यानंतर तो कधीही तसाच ठेवू नका. मऊ कपड्याने तो नेहमी कोरडा पुसून ठेवावा.