अंजली राऊत
कडकनाथ कोंबडीचा काळसर रंग हा तिच्यामध्ये असलेल्या मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे असतो. या कोंबडीमध्ये मेलॅनिनचे प्रमाण अगदी जास्त असल्यामुळे तिचा रंग, त्वचा आणि मांससुद्धा काळ्याच रंगाचे असते.
कडकनाथचे मांस खूप मऊ, चविष्ट आणि आरोग्यदायी अौषधी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. त्यात चरबी कमी आणि प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे ते निरोगी मांस मानले जाते.
कडकनाथचे मांस हे लोह आणि अमीनो आम्लांनी समृद्ध असते आणि मधुमेह, अशक्तपणा आणि हृदयरोग असलेल्या रुग्णांसाठी ते फायदेशीर मानले जाते.
ही कोंबडी प्रामुख्याने मध्य प्रदेशातील झाबुआ, धार आणि बडवानी जिल्ह्यांमध्ये आढळते. औषधी गुणधर्मामुळे आता देशाच्या अनेक भागात कडकनाथ कोंबडी पाळली जात आहे.
कडकनाथ कोंबडी पालनातून शेतकरी जोडधंदा म्हणून चांगला नफा कमावत आहेत. कारण एक कडकनाथ कोंबडी ही 800 ते 1500 रुपयांना आणि कोंबडी 500 ते 1000 रुपयांना विकली जाते.
कडकनाथला भारत सरकारने जीआय टॅग प्रदान केला आहे, ज्यामुळे कडकनाथला विशेष दर्जा आणि मान्यता मिळाली आहे.
योग्य वातावरणात व योग्य प्रतीचे खाद्य दिल्यावर या कोंबडीची वाढ चांगली होते. तीन ते साडेतीन महिन्यांत साधारण एक किलो वजन होते.
साधारणपणे, कडकनाथ कोंबडी अंदाजे 6 ते 8 वर्षे जगू शकते. परंतु, जर योग्य काळजी घेतल्यास कडकनाथचे आयुष्य आणखी वाढते.