GK, Camphor : तुम्हाला माहित आहे का, कापूर का पेटतो?

अंजली राऊत

कापूर पेटवला की त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. पण तुम्हाला माहित आहे काय, हा कापूर कोणत्या गुणधर्मामुळे पेटतो ?

दोन प्रकारचे कापूर

नैसर्गिक आणि कृत्रिम कापूर असे बाजारात दोन प्रकारचे कापूर उपलब्ध आहेत. नैसर्गिक कापूर हा कापूराच्या झाडापासून तयार केलेला असतो. त्याचे वैज्ञानिक नाव 'सिनामोमम कॅम्फोरा' असं आहे

कापूर, दुर्मिळ झाड

नैसर्गिक कापूर हा पश्चिम घाट, पूर्व हिमालय आणि अंदमान बेटांसारख्या भागात कापूर वृक्षांच्या लागवडीपासून मिळवला जातो. आपल्या देशात पूर्वी ही झाडे मोठ्या प्रमाणात होती, मात्र आता ती दुर्मीळ होत चालली आहेत. या झाडाची पाने गोल आणि 4 इंच - रूंद असतात.

कापूराचे झाड कुठे आहे ?

कापूराचे झाड प्रामुख्याने पूर्व आशियामध्ये म्हणजेच चीनमध्ये आढळते. या झाडाचे मूळ जपानमध्ये आहे. चीनमधील लोक औषधांमध्ये कापूर वापरतात.

सालीपासून मिळतो कापूर

कापूर हा झाडाच्या सालीपासून तयार केला जातो. झाडाची साल सुकल्यावर त्याचा रंग तपकिरी-राखाडी होतो. त्यानंतर साल झाडापासून वेगळी केली जाते. ही साल नंतर गरम करून शुद्ध केली जाते आणि त्याची बारीक पावडर तयार केली जाते, ही पावडर म्हणजेच कापूर असतो

50 ते 60 फूट उंचीचे कापूराचे झाड

कापूराचे झाड ५० ते ६० फूट उंच म्हणजेच आंब्याच्या झाडाइतके वाढते. कायम हिरवेगार राहत असून अर्धा किलोमीटर परिसरातील हवा शुद्ध करते. या झाडाच्या सर्व भागात तेल असते.

यांना मिळाले यश पण टिकले नाही

1932 च्या एका संशोधनात, कोलकाता येथील स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनचे आर. एन. चोप्रा आणि बी. मुखर्जी यांनी असे नोंदवले की 1882-1883 दरम्यान लखनऊच्या बागायती बागांमध्ये कापूराची लागवड यशस्वी केली, परंतु हे यश जास्त काळ टिकले नाही

ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यामुळे

कापूरामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचे प्रमाण खूप असते. त्यामुळे कपूर खूप कमी उष्णतेने जळू लागतो. त्याची वाफ हवेतून वेगाने पसरते आणि वातावरणातील ऑक्सिजनशी संपर्क झाल्यावर कापूर सहज पेट घेतो.

Diwali Broom Worship
दिवाळीत लक्ष्मीपूजनाला का करतात झाडूची पूजा? शास्त्र काय सांगतं?