Girolando : गायीची ही जात दररोज सरासरी 100 लिटर दूध देते!

Namdev Gharal

आज आपण ब्राझिलमधील एका सर्वाधिक दूध देणाऱ्या गायीविषयी जाणून घेऊ, ही गाय म्हणजे गिरोलँडो Girolando या गायीचा संबध भारतीय गीर गायीशी थेट आहे

Girolando ही प्रजाती भारताची मूळ देशी गीर (Gir) आणि युरोपियन होल्स्टिन फ्रिशियन (Holstein Friesian - HF) यांच्या संकरातून ब्राझीलमध्ये विकसित करण्यात आली आहे.

या जातीच्या 'मारिलिया' (Marília ) नावाच्या गिरोलँडो गायीने एकाच दिवसात तब्बल १२७.५७ लिटर दूध देऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एका दिवसात सर्वाधिक दूध देण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

उष्ण हवामान सहन करण्याची अफाट क्षमता: शुद्ध HF गायींना भारतासारख्या उष्ण व दमट हवामानात त्रास होतो; मात्र गीरच्या जनुकामुळे गिरोलँडो ४०°C पेक्षा जास्त तापमानातही शरीराचे तापमान संतुलित ठेवून उत्तम दूध देऊ शकते.

ब्राझीलच्या दूध उत्पादनाचा कणा: ब्राझीलमध्ये उत्पादित होणाऱ्या एकूण दुधापैकी जवळपास ८०% दूध एकट्या गिरोलँडो जातीच्या गायींकडून मिळते.

एका वेतात ही गाय सरासरी ५,००० ते ८,००० लिटर दूध सहज देते, तर चांगल्या व्यवस्थापनात ही क्षमता १०,००० लिटरच्या पुढे जाते. दररोज सरासरी ३० ते ५० लिटर दूध देण्याची तिची क्षमता असते.

शुद्ध HF गायींच्या दुधाच्या तुलनेत गिरोलँडोच्या दुधात फॅट (सरासरी ३.८% ते ४.२%) आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हे दूध अधिक घट्ट व पौष्टिक मानले जाते.

गोचीड, चतुर व इतर परजीवी कीटकांचा प्रादुर्भाव या गायींवर कमी होतो. तसेच Mastitis सारख्या गंभीर आजारांना ही गाय सहज बळी पडत नाही. या जातीचे वळूही ब्रीडींगसाठी फायदेशीर ठरतात

दीर्घायुष्य आणि पुनरुत्पादन क्षमता: इतर संकरित गायींच्या तुलनेत गिरोलँडोचे उत्पादनक्षम आयुष्य जास्त असते. ती १५ वर्षांपर्यंत सहज जगून १० ते १२ वेत देऊ शकते आणि भाकड काळ अत्यंत कमी असतो.

कमी खर्चात उत्कृष्ट रूपांतर: ही गाय निकृष्ट दर्जाचा चारा किंवा सामान्य गवताचेही शरीरात दर्जेदार दुधात रूपांतर करू शकते, ज्यामुळे डेअरी फार्मचा खाद्य खर्च नियंत्रित राहतो.